सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
जाहिरात व फलक नियंत्रण नियमावली, २०१३
(महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम २४४ व २४५, मुंबई प्रांतिक महानगरपालिका जाहिरात व फलक नियंत्रण नियम, २००३ व महाराष्ट्र मालमत्तेच्या
विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम, १९९५ यांवर आधारित)
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
जाहिरात व फलक नियंत्रण नियमावली, २०१३
.
१.१ संक्षिप्त नाव :- सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका जाहिरात व फलक
नियंत्रण नियमावली , २०१३
१.२ व्याप्ती
:- ही नियमावली सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
क्षेत्रासाठी लागू राहील.
--
१.३ प्रारंभ
..
:- ही नियमावली राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून अंमलात
येईल. - ही नियमावली सर्वसाधारणपणे जाहिरात फलक, फलक,नामफलक, निर्देश फलक, जाहिरातीचे फुगे, खांबावरील जाहिरात फलक, रोषणाई केलेल्या जाहिराती, भित्तीपत्रके, तात्पुरत्या कमानी व जाहिरातीसाठी वापरली जाणारी इतर साधने यांना लागू राहील.
२. व्याख्या :- (एक) या नियमावलीमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, (१) "अधिनियम" म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम,
(२) "जाहिरात" याचा अर्थ, आणि त्यामध्ये शब्द,अक्षरे, प्रतिमाने, कोणत्याही साधनाच्या किंवा भित्तीपत्रकाच्या सहाय्याने खूण करणे, जाहिरातफलक, फलक, तात्पुरत्या कमानी, रोषणाई केलेली चिन्हे, नामफलक, निर्देश फलक रस्त्यावर अस्तित्वात असलेल्या खांदावरील लहान जाहिरात फलक, फुगे, इत्यादींच्या व्दारे केलेली घोषणा किंवा निदेशन यासारख्या कोणत्याही पध्दतीच्या कोणत्याही अभिवेदनाचा समावेश होतो, आणि त्यानुसार जाहिरातीकरण या संज्ञेचा अन्वयार्थ लावण्यात येईल. (३) "अभिकरण "म्हणजे जाहिरातीसाठी अर्ज करणारी व्यक्ती, आणि त्यामध्ये व्यक्तीचा • संस्थेचा समावेश होतो मग ती संस्था विधी संस्थापित असो किंवा नसो, (४) "परिशिष्ट" म्हणजे या नियमाचे परिशिष्ट, (५) "मान्य" म्हणजे आयुक्ताने मान्य केलेले, (६) "कापडी फलक" म्हणजे, जाहिरातीचा समावेश असणारे कापड किंवा इतर कोणतेही साहित्य. (७) "इमारत रेषा "म्हणजे, अशी रेषा जेथपर्यत रस्त्याला लागून असलेल्या इमारतीचे जोते वैधरित्या वाढविता येईल किंवा रस्त्याचा अथवा भावी काळातील रस्त्याचा विस्तार करता येईल आणि त्यामध्ये कोणत्याही योजनेमध्ये या विकास आराखडयामध्ये, अथवा त्यावेळेपुरते अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये विहित, केली असल्यास, केलेल्या रेषेचा अंतर्भाव होतो.
(८) "वाहन मार्ग " म्हणजे, रस्त्याचा असा भाग की ज्यावरुन वाहने जाण्यास परवानगी दिली
आहे, ... (९) " आयुक्त" म्हणजे, महानगरपालिका आयुक्त किंवा त्याने कोणताही यथोचितरीत्या प्राधिकृत केलेला महानगरपालिकेचा अधिकारी, (१०) " महानगरपालिका " म्हणजे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदी अन्वये स्थापन केलेली आणि रचना केलेली महानगरपालिका, (११) "इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलक" म्हणजे, इलेक्ट्रॉनिक पध्दतीने चालणारा जाहिरात फलक,
(१२) " नमुना" म्हणजे या नियमांचा जोडलेला नमुना, ... (१३) "संरक्षक कठडा " म्हणजे, वाहतुकीस व पादचाऱ्यांना ये-जा करण्यास मार्गदर्शन
करण्यासाठी रस्त्यावर किंवा यथास्थिती, मध्यक, पदपथ, पूल इत्यादीवर धातूच्या किंवा इतर पदार्थ उदा. फायबर इत्यादी खांबाच्या आधारे बसवलेला कठडा, (१४) "जाहिरात फलक" म्हणजे, जाहिरातीच्या प्रयोजनासाठी तिच्याशी संबंधित असलेला आणि कोणत्याही पध्दतीने प्रदर्शित केलेल्या व्यक्तिरेखा, अक्षरे आणि चित्रांकन यांसह जमिनीवर, एखाद्या इमारतीच्या एखाद्या छताच्या कोणत्याही भागावर किंवा पाळावर (पॅरापेट) किंवा वरच्या बाजूवर उभारलेला संरचनेचा कोणताही दर्शनी भाग, (१५) " भित्तीपत्रके" म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यासाठी वापरलेला कागदाचा मोठा तुकडा किंवा इतर कोणतेही साहित्य, (१६) "सडक रेषा " किंवा "रस्ता रेषा" म्हणजे सडकेच्या किंवा, यथास्थिती रस्त्याच्या बाजूला मर्यादा निश्चित करणारी रेषा. (१७) " मध्यवर्ती आवर्तन स्थान" (रोटरी) म्हणजे, वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रस्त्याच्या जंक्शनवरील मध्यवर्ती बेट, (१८) "थांब रेषा " म्हणजे, ज्या रेषेवर सर्व वाहने चौक पार करण्याआधी थांबतात ती रेषा, (१९) "तात्पुरत्या कमानी" म्हणजे, विख्यात व्यक्तींना शुभेच्छा देण्यासाठी किंवा जाहिरातींच्या प्रदर्शनासाठी रस्त्यावर उभारलेल्या तात्पुरत्या संरचना, (२०) "कायमस्वरुपी कमानी" म्हणजे रस्त्यावर दिशादर्शक व जाहिरात फलक लावण्यासाठी उभ्या केलेल्या कायमस्वरुपी कमानी, (२१) " वाहतुक बेट" म्हणजे रस्त्यावरील किंवा रस्त्याच्या संयोबावरील असे क्षेत्र की, ज्यावरुन वाहने लाऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे वाहनांना ठराविक मार्गाने ये-जा करणे सुकर होईल, (२२) "वृक्ष संरक्षक जाळी" म्हणजे, वृक्षांच्या संरक्षणासाठी वारलेले वृक्षाभोवतीचे कुंपण किंवा कठडा. (दोन) या नियमावलीत वापरलेले, परंतु व्याख्या न केलेले शब्द आणि शब्दप्रयोग यांना, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये जे अर्थ नेमून दिलेले असतील तेच त्यांचे अर्थ असतील.
३. ही नियमावली पुढील बाबतीत लागू राहणार नाही - (एक) महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या परंतु या क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या
महानगरपालिकेव्यतिरिक्त इतर स्थानिक प्राधिकरणाच्या लेखी परवानगीने व महानगरपालिकेकडून जाहिरात प्रदर्शनासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन
प्रदर्शित केलेली जाहिरात. (दोन) कोणत्याही इमारतीमध्ये चालविला जाणारा व्यापार, व्यवसाय किंवा धंदा यांच्या
संबंधातील असेल व ती त्या इमारतीच्या खिडकीमध्ये प्रदर्शित केलेली असेल अशी
जाहिरात. (तीन) जिच्यामध्ये किंवा जिच्यावर अशी जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली असेल त्या
जमिनीमध्ये किंवा इमारतीमध्ये चालविला जाणारा व्यापार, व्यवसाय किंवा धंदा यांच्याशी किंवा अशी जमीन किंवा इमारत किंवा त्यातील कोणत्याही चीजवस्तू कोणत्याही प्रकारे विकण्याशी किंवा भाडयाने देण्याशी किंवा तिच्यामध्ये अथवा तिच्यावर करण्यात येणारी
कोणतीही विक्री, करमणूक किंवा सभा यांच्याशी संबंधित जाहिरात. (चार) जिच्यामध्ये किंवा जिच्यावर जाहिरात प्रदर्शित केलेली असेल अशा जमिनीच्या किंवा
इमारतीच्या नावाशी अथवा अशा जमिनीच्या किंवा इमारतीच्या मालकाच्या किंवा
भोगवटादाराच्या नावाशी संबंधित जाहिरात. (पाच) रेल्वे प्रशासनाच्या कामकाजाशी संबंधित असेल आणि ती कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या
आत किंवा रेल्वे प्रशासनाच्या कोणत्याही भिंतीवर किंवा अन्य मालमत्तेवर प्रदर्शित __ केलेली जाहिरात. (सहा) वृत्तपत्रातील जाहिराती , (सात) आकाशवाणी आणि दुरदर्शन यांवरील जाहिराती,
४. महानगरपालिकेच्या जमिनीवरील जाहिरात फलक - महाराष्ट्र महानगरपालिका
अधिनियमाच्या कलम ७९ च्या आणि या नियमावलीच्या तरतुदीस अधीन राहून महानगरपालिका महानगरपालिकेच्या जमिनीवरील जाहिरात फलकांना परवानगी देऊ शकेल.
५. परवानगी मिळण्याबाबतची आणि तिचे नूतनीकरण करण्याबाबतची कार्यवाही
(१) आयुक्तांच्या लेखी परवानगी शिवाय कोणतेही अभिकरण जाहिरात लावणार नाही.
(२) कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक उभारण्यासाठी किंवा जाहिरात करण्यासाठी
कोणतेही इच्छुक अभिकरण नमुना 'अ' मध्ये किंवा परवानगीच्या नूतनीकरणाच्या बाबतीत नमुना 'ब' मध्ये आयुक्तांनी वेळोवेळी निर्धारीत केलेल्या शुल्कांसह एकत्रितपणे दोन प्रतीत अर्ज करील.
(३) अर्जास पुढील दस्तऐवज जोडण्यात येतील. .
(एक) ज्या जमिनीवर जाहिरात फलक उभारण्यात येणार आहे त्या जमिनीच्या मालकाची
लेखी परवानगी व जमिनीची मालकी दर्शविणारे दस्तऐवज यांच्या प्रती, (दोन) जाहिरात किंवा जाहिरात फलक उभारण्याचे प्रस्तावित केलेले ठिकाण
दर्शविणान्या जागेच्या नकाशाच्या तीन प्रती, (तीन) निशाणे किंवा भित्तीपत्रके किंवा फुगे यांवरील जाहिराती वगळता अन्य बाबतीत,
संरचना अभियंत्याने काढलेले जाहिरातीचे संकल्पचित्र, (चार) स्थानिक पोलीसांच्या वाहतूक विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, (पाच) सक्षम अखत्यारीने जाहिरातीतील मजकूर तपासल्याबाबतचे प्रमाणपत्र. (सहा) महानगरपालिका आयुक्त यांनी निर्धारीत केलेली पडताळणी सूची. (सात) विद्युत रोषणाई केलेल्या जाहिरात फलकांच्या बाबतीत नोंदणीकृत विद्युत
अभियंत्याचे प्रमाणपत्र.
(४) अर्जदार या नियमावलीमध्ये वर्णन केलेल्या सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वांचा अवलंब
करेल. . ...
(५) प्रत्येक ठिकाण आणि जाहिरातीचा प्रकार यासाठी वेगळा अर्ज करणे आवश्यक आहे.
(६) महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जाची पोच देण्यात येईल आणि अर्ज प्राप्त
झालेल्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आंत त्यावरील निर्णय लेखी स्वरुपात
आयुक्तांकडून अर्जदाराला कळविण्यात येईल. जर अर्जदाराने या नियमावलीतील सर्व मार्गदर्शक तत्वांची पुर्तता करून अर्ज सादर केलेला असेल व अशा अर्जावरील निर्णय विहित कालावधीत अर्जदाराला कळविला नाही तर त्याला परवानगी दिल्याचे मानण्यात येईल, परंतु अर्जावर निर्णय घेतांना आयुक्त या नियमावलीतील मार्गदर्शक तत्वांना
बांधिल असतील.
(७) पोट-नियम
(६) अन्वये परवानगी देण्यात आल्यावर किंवा परवानगी दिल्याची मानण्यात
आले असेल तर, अभिकरण, भाडे आणि / किंवा यथास्थिती, शुल्क किंवा दोन्ही, जाहिरात प्रदर्शित करण्यापूर्वी किंवा परवानगीच्या दिवसांपासून १५ दिवसांच्या आत देईल. ते देण्यात अभिकरणाने कसूर केल्यास, उक्त पंधरा दिवसांचा कालावधी
संपल्यानंतर ती परवानगी लगेच रद्द होईल.
(८) परवानगी देण्यात आल्यावर, आयुक्त नमुना-क मधील लायसन देतील. (९) एका विशिष्ट ठिकाणी जाहिरातीसाठी, दोन वर्षाहून अधिक नाही इतक्या कालावधीसाठी
परवानगी देता येईल. भाडे आकार आणि / किंवा शुल्क, आयुक्तांनी ठरविलेल्या दरानुसार अभिकरणाकडून वसूल करण्यात येईल आणि ते देणे अभिकरणावर बंधनकारक असेल. अभिकरणाकडून महानगरपालिकेला अग्रीम म्हणून सहा महिन्यांचे भाडे किंवा शुल्क आगाऊ देण्यात येईल.
६. अनधिकृत जाहिरात फलक,इत्यादी काढून टाकणे किंवा पाडून टाकणे - आयुक्तांच्या
पूर्व लेखी परवानगी शिवाय किंवा नियम ५ च्या पोटकलम (१) ते (५) चे उल्लंघन करून उभारलेले कोणतेही जाहिरात फलक अनधिकृत म्हणून समजण्यात येईल आणि ते यथास्थिती कोणतीही पूर्वसुचना न देता पाडून टाकण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी पात्र असतील व असे फलक महानगरपालिकेमार्फत काढून घेण्यात आल्यानंतर त्याबाबतचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.
७. नियम ५ च्या उल्लंघनासाठी दंड - महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम
२४५ च्या तरतुदींच्या अनुरोधाने करता येईल अशा कोणत्याही कृतीस बाधा न आणता कोणतेही अभिकरण नियम ५ च्या तरतुर्दीचे उल्लंघन करीत असेल तर अपराध सिध्द झाल्यावर त्यास पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल एवढ्या दंडाची शिक्षा करण्यात येईल.
८. जाहिराती किंवा जाहिरात फलक नियमित करण्याचे आयुक्तांचे अधिकार -
आकारणीयोग्य शुल्काच्या पाच पटीहून अधिक नसणारे प्रशमन शुल्क आकारून आयुक्तास त्याच्या स्वेच्छानिर्णयाने आणि लेखी आदेशाद्वारे परवानगीविना उभारण्यात आला असेल मात्र असा जाहिरात. फलक या नियमावलीतील इतर सर्व नियमांची पुर्तता करीत असेल तरच अशा कोणत्याही जाहिरात फलकाची उभारणी नियगित करता येईल.
.
9.सर्वसाधारण शर्ती - जाहिरातीसाठीची परवानगी पुढील मार्गदर्शक तत्वांद्वारे देण्यात येईल आणि अशी मार्गदर्शक तत्वे अतिरिक्त शर्ती असल्याचे मानण्यात येईल आणि ती, परवानगीचाच भाग असतील.
९.१ जाहिरात फलकाचा आकार व उंची (एक) जाहिरात फलकाचा प्रमाण आकार पुढील प्रमाणे असेल क) ३.०५ मीटर (१० फूट) x ६.१० . . मीटर (२० फूट) ख) ६.१० मीटर (२० फूट) x ६.१०. मीटर (२० फूट) ग) ९.१५ मीटर (३०फूट) . x ४.५७५ मीटर (१५ फूट) घ) ९.१५ मीटर (३० फूट) x ६.१० मीटर (२०फूट) ड) १२.२ मीटर (४० फूट) x ३.०५ मीटर (१० फूट) च) १२.२ मीटर (४० फूट) x ६.१० मीटर (२० फूट) परंतु तथापि, , १)बंदिस्त भिंत,
२)भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार,
३)वरपुलाचे कठडे आणि असेच इतर विषम आकाराचे कोनाडे यांवरील जाहिरातींबाबत त्याचप्रमाणे नदीतील गलबते, तराफे, जलयाने आणि वाहने यांवरील
जाहिरातींबाबत, (दोन) इमारतीच्या संरचनात्मक स्थिरतेच्या अधीनतेने, इमारतीच्या टोकावर ६० फूट x
२० फूट या प्रमाणेतर आकाराचे जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्याचा अपवाद वगळता, कमाल प्रमाणे आकाराहून अधिक आकाराच्या जाहिरात
फलकांना परवानगी देण्यात येणार नाही. (तीन) जमिनीवरील जाहिरात फलक रस्त्याच्या पातळीच्या १२.२ मीटर (४० फूट) पेक्षा
अधिक उंचीवर उभारता येणार नाही. जाहिरात फलकाचा पृष्ठतळ किंवा तळभाग हा रस्त्याच्या पातळीपासून ३ मीटर पेक्षा कमी नसेल, इतक्या उंचीवर
-असेल. (चार) इमारतीच्या गच्चीवर जाहिरात फलक लावतांना, जाहिरात फलकाची कमाल उंची
गच्चीच्या पातळीपासून १२.२ मीटर (४० फूट) पेक्षा अधिक असता कामा नये. (पाच) विद्यमान रस्त्याच्या किंवा मार्गाच्या रूंदीपासून पुढे १.५० मीटर एवढे किमान
अंतर ठेवण्यात येईल. पदपथावर कोणताही जाहिरात फलक किंवा जाहिरात
लावण्यात येणार नाही. (सहा) पोचमार्गाच्या विराम रेषेपासून २५ मीटर अंतरामध्ये रस्त्याच्या बाजूने कोणताही
जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. (सात) फुग्यांवरील जाहिरातींच्या बाबतीत फुग्याचे टोक आणि रस्त्याची पातळी यामधील
अंतर २० मोटरहुन कमी नसावे.
९.२ रंग वाहतुक चिन्हांबाबत संभ्रम निर्माण होतील असे व वैद्यकीय / तातडीच्या सेवांसाठी वापरले जाणारे तांबडा, जांभळा, अंबर इत्यादी रंग जाहिरात फलकात वापरता येणार नाहीत.
९.३ रोषणाई केलेल्या किंवा इलेक्ट्रॉनिक जाहिराती - आयुक्त, पुढे दिलेल्या वर्णनाच्या रोषणाई केलेल्या किंवा इलेक्ट्रॉनिक जाहिरातींना परवानगी देणार नाही. (एक) ज्यायोगे वाहनचालकाच्या किंवा पादचाऱ्याच्या डोळ्यावर तिरीप येईल अथवा डोळ्यांना त्रास होईल अथवा ज्यामुळे वाहने चालविण्यामध्ये अन्य प्रकारे अडथळा निर्माण होईल इतक्या प्रखरतेची किंवा चकाकीची रोषणाई केलेल्या जाहिराती. (दोन) ज्यायोगे कोणतेही अधिकृत वाहतूक चिन्ह, साधन किंवा सिग्नल इत्यादी अस्पष्ट दिसतील किंवा त्यांची परिणामकारकता कमी होईल अशा, रोषणाई केलेल्या जाहिराती. . (तीन) रोषणाई उंची (Level of Illumination) ९ सीडी / सीएम २ एवढ्या प्रभाव मर्यादेपेक्षा (Source Limit ) जी एसीआयएच ( १९९७) द्वारे सचित केलेले टीएलव्ही दर्शविते त्यापेक्षा अधिक असता कामा नये आणि दिवासाला (२४ तास) ८ तासांपेक्षा
जास्त नाही एवढ्या कार्यचालन मर्यादेपेक्षा (Operational Limit) अधिक असता कामा नये. (चार) निवासी जगांमधील निऑन चिन्हे लुकलुकणारी नसावीत. (पाच) रोषणाई, मध्यरात्री शून्य प्रहरी बंद ठेवावी.
९.४ जाहिरातीसाठी उभारलेल्या सांगाड्याची रचना - . (एक) सांगाड्याची रचना नोंदणीकृत संरचना अभियंता यांनी प्रमाणित केलेली असावी.
(दोन) संरचनेबाबतचे सर्व नियम व Indian Structural Design Standards यांची पुर्तता केलेली असावी.
(तीन) सांगाडा सुस्थितीत असावा व दृष्य व परिणामकारक अशा रंगांनी सांगाडा रंगविलेला असावा.
(चार) सांगाड्यावर उजव्या बाजूला जाहिरातीच्या खालच्या कोपऱ्यात लायसन्सधारक अथवा जाहिरातदाराचे नाव, जाहिरात प्रदर्शनासाठी परवानगी दिलेला कालावधी व परवानगी क्रमांक याबाबत माहिती लिहिलेली असावी.
९.५ फुग्यांवरील जाहिराती - हवेत किंवा पाण्यात फुगे तरंगवून जाहिरात
करण्याची,आयुक्तास परवानगी देता येईल. फुग्याचे टोक आणि रस्त्याची पातळी यामधील अंतर २० मीटरहून कमी नसावे. किमान उंची, वाहतूक सुरक्षितपणे होण्यात बाधा न आणणारी किंवा अगोदरच लावलेली कोणतीही जाहिरात न झाकणारी अशी असावी. - मध्यवर्ती आवर्तन स्थानांवरील आणि वाहतुक बेटांवरील जाहिराती -
आयुक्त मान्यता देईल अशा मध्यवर्ती आवर्तन स्थानांवर किंवा वाहतूक बेटांवर जाहिरात लावण्याची एखाद्या अभिकरणाला मुभा देऊन अशी मध्यवर्ती आवर्तन स्थाने व वाहतूक बेटे विकसित करण्याबाबत आणि त्यांचे परिरक्षण करण्याबाबत आयुक्ताने त्या अभिकरणाला परवानगी द्यावी. जाहिरात लावताना तिचा आकार मध्यवर्ती आवर्तन स्थानावर व वाहतूक बेटाच्या स्थानावर आणि त्यांच्या आकारावर तसेच वाहतुकीच्या प्रमाणात अवलंबून असेल. तथापि, जाहिरातीची उंची मध्यवर्ती आवर्तन स्थानाच्या उंचीच्या वर किंवा चालकाच्या नजरेच्या टप्प्यावर ठेवण्याची परवानगी देता येणार नाही. परवानगीचा कालावधी हा अभिकरण आणि आयुक्त यांच्या मध्ये मान्य होईल असा असेल. अभिकरण, कंत्राटाच्या संपूर्ण कालावधीमध्ये मध्यवर्ती आवर्तन स्थान किंवा वाहतूक बेट यांचे
परिरक्षण करील.
९.६ संरक्षक कठडे किंवा रस्त्याचे मध्यक किंवा पदपथ यांवरील जाहिराती -
आयुक्तास योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तीवर त्याने एखाद्या अभिकरणाला संरक्षक कठडे किंवा रस्त्याचे मध्यक किंवा पदपथ यांवर जाहिरात लावण्याची मुभा देऊन अशी स्थाने बांधण्यास व त्यांचे परिरक्षण करण्यास परवानगी द्यावी.
९.७ वृक्ष संरक्षक जाळ्यांवरील जाहिराती - आयुक्तास योग्य वाटतील अशा
अर्टीवर व शतीवर त्याने एखाद्या अभिकरणाला वृक्ष संरक्षक जाळ्यांवर जाहिरात लावण्याची मुभा देऊन झाडाभोक्ती मान्य अशा रचनाकृतीची वृक्ष संरक्षक कुंपणे
बांधण्यास व त्यांचे परिरक्षण करण्यास परवानगी द्यावी.
९.८ कापडी फलक किंवा भित्तीपत्रके किंवा तात्पुरत्या कमानी यांद्वारे जाहिरात -
आयुक्ताने, वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यास योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तीवर एखाद्या अभिकरणास सार्वजनिक ठिकाणी कापडी फलक किंवा
भित्तीपत्रके, किंवा तात्पुरत्या कमानी यांद्वारे जाहिरात करण्याची परवानगी द्यावी. ९.१० विद्युत खांबांवरील जाहिराती (एक)जाहिरात फलकाची रुंदी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या किंवा पदपथावरील दिव्यांच्या खांबांच्या स्थानावर अवलंबून असेल. (दोन) कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीच्या मार्गावर प्रत्यक्ष वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी जाहिरात फलक लावता येणार नाही.. (तीन) जाहिरातीचा आकार १ मीटर x १.२५ मीटरपेक्षा अधिक असता कामा नये. (चार) जमिनीच्या पातळीपासून जाहिरात फलकाच्या तळापर्यंतचे किमान अंतर ३ मीटरपेक्षा कमी असता कामा नये.
१०. जाहिरात फलकांना पुढील परिस्थितीत परवानगी देण्यात येणार नाही (एक) महानगरपालिकेच्या मते कोणत्याही जाहिरात फलकामुळे प्राधिकृत वाहतुक चिन्ह
अथवा सिग्नल याबाबत गोंधळ निर्माण होण्याचा संभव असणे. (दोन) जाणाऱ्या येणाऱ्या किंवा दोन मार्गी वाहनांना वाहतूक करण्यामध्ये अडवणूक होईल अथवा मार्ग दिसण्यामध्ये अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने व अशा ठिकाणी कोणताही जाहिरातफलक लावणे. .. (तीन) सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्यासाठी असलेल्या ठिकाणाहून ते पाहण्यासाठी अडथळा निर्माण होईल अशा कोणत्याही जाहिरातफलकास परवानगी देण्यात येणार नाही. (चार) आयुक्त ठरवतील अशा पुरातत्वशास्त्रीय, ऐतिहासिक किंवा वंशीयदृष्ट्या महत्वाच्या असतील अशा इमारतींवर जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
. . (पाच) ऐतिहासिक, पुरातत्वशास्त्रीय, वंशीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कोणत्याही इमारतीचे अथवा स्मारकाचे अवलोकन करण्यात अडथळा आणण्याचा संभव आहे असा किंवा अशी कोणतीही इमारत अथवा स्मारक उभारण्याच्या आड येईल असा, कोणताही
जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. (सहा) नदीच्या व पाणवठ्याच्या ठिकाणांच्या किनाऱ्यावरील झाडांवर अथवा १०० मीटर अंतरामध्ये कोणताही नवीन जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
तथापि, हा निबंध, विद्यमान इमारतीवरील जाहिरातफलक अथवा विद्यमान रस्त्याच्या किंवा इमारतीच्या किनाऱ्याकडील बाजूस असलेल्या जाहिरात फलकास लागू होणार
नाही. (सात) ज्या इमारतीचे भोगवाटा प्रमाणपत्र नाही, अशा इमारतीवर जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. (आठ) ज्या इमारतीबाबत अधिनियमान्वये किंवा नगररचना अधिनियमान्वये महानगरपालिका स्तरावर अथवा न्यायालयात कारवाई प्रलंबित असेल किंवा ज्या इमारतीच्या मालकाला अधिनियमान्वये काम थांबवा नोटीस बजावण्यात आली असेल, अशा इमारतीवर जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. (नऊ) जी इमारत (अंशतः किंवा पूर्णतः) धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली. असेल अथवा अधिनियमान्वये जिला तशा प्रकारची नोटीस बजावण्यात आली असेल, अशा इमारतीवर जाहिरात फलक लावण्यात येणार नाही." (दहा) ज्यावरील जाहिरातीद्वारे सार्वजनिक नीतिमत्ता आणि सभ्यता यांचे उल्लंघन होण्याचा संभव आहे असा जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. अशी जाहिरात प्रदर्शित केल्याने सार्वजनिक नितिमत्ता व सभ्यता यांच्या प्रमाणकांचा भंग होईल अशी आयुक्ताची खात्री झाली तर, अशी लेखी सूचना प्राप्त झाल्यानंतर अभिकरण,
ती जाहिरात तात्काळ काढून टाकील (अकरा) पादचाऱ्यांच्या मार्गामध्ये किंवा त्यांना मार्ग दिसण्यामध्ये अडथळा निर्माण होईल अशा स्वरूपातील जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. (बारा) कोणत्याही स्थानिक सुखसोयीला व नागरी सोयी सुविधांना बाधक ठरेल अशा जाहिरातफलकास परवानगी देण्यात येणार नाही.. (तेरा) अगोदर लावलेली कोणतीही जाहिरात दिसण्यामध्ये अडथळा निर्माण होईल असा जाहिरातफलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. (चौदा) जाहिरात फलकाच्या प्रत्येक बाजूला २५ मीटर अंतरातील अस्तित्वात असलेले वृक्ष राखणे, जतन व संरक्षण करण्याची एकमेव जबाबदारी जाहिरात फलक लावणाऱ्या संस्थेची असेल या अटीची पूर्तता होण्यासाठी अशी संस्था व्याजमुक्त अनामत रक्कम रूपये २५००/- (रूपये दोन हजार पाचशे फक्त) प्रत्येक वृक्षासाठी जमानत ठेव म्हणून ठेवील. हे नियम अस्तित्वात येण्यापूर्वी जाहिरात फलक उभारण्यास मान्यता मिळालेली संस्था फलकाच्या प्रत्येक बाजूला २५ मीटर अंतरातील दोन वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या वृक्षाची महानगरपालिकेच्या बगीच्या अधीक्षकांच्या मान्यतेने इतरही जातीच्या वृक्षांची पुनर्स्थापना करेल. तसेच पुनर्स्थापनेसाठी रू. ५००/- (रूपये पाचशे फक्त) ठेव महानगरपालिकेकडे प्रति वृक्षाप्रमाणे जमा करेल. (पंधरा) कोणत्याही परिस्थितीत वृक्षांवर जाहिरात प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
(सोळा) ज्या जाहिरात फलकांमुळे एखाद्या इमारतीत नैसर्गिक प्रकाश येण्यासा अडथळा होईल व वायूवीजनास अडथळा होईल अशा जाहिराती लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. '(सतरा) रस्ते किंवा रेल्वेमार्ग एकत्र मिळतात अशा ठिकाणी व अशा ठिकाणांहून २५
मीटर अंतरापर्यंत जाहिराती लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. (अठरा) दोन जाहिरात फलकांमधील अंतर २५ मीटरहून कमी असल्यास जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. (एकोणीस) उच्च दाब व लघु दाब विद्युत वाहीन्यांपासून १० मीटर अंतरापर्यंत जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. (वीस) दवाखाने, शैक्षणिक संस्था, दफन भूमी व दहन भूमी, उद्याने इत्यादींसमोर
आहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही. (एकवीस) शासकीय कार्यालये व महानगरपालिकेची कार्यालये यांच्यापासून १०० मीटर
अंतरापर्यंत जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
११ जाहिरात फलकावर पुढील मजकूर व चित्र प्रदर्शित करण्यास परवानगी देता येणार
नाही- (एक) धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर व चित्र. . (दोन) हिंसादर्शक, हिंसक कृती दर्शक मजकूर व चित्र. (तीन) नग्नता दर्शक व अश्लील मजकूर व चित्र. (चार) प्राण्यांवरील अत्याचार, पिळवणूक दर्शक मजकूर व चित्र. . (पाच) स्त्री व बालक यांच्यावरील अत्याचार व पिळवणूक दर्शक मजकूर व चित्र . (सहा) तंबाखूजन्य पदार्थ व व्यसनांचा प्रचार व प्रसार करणारा मजकूर व चित्र. (सात) कोणताही देश व कोणतीही संस्था याबाबत नकारात्मक प्रचार करणारा मजकूर व
.. चित्र. . (आठ) सार्वजनिक नीतिमत्ता व संभ्यता यांचे उल्लंघन करणारा मजकूर व चित्र.
(नऊ) शस्त्रास्त्रे व शस्त्रास्त्रांसंबधी माहिती देणारा मजकूर व चित्र. (दहा) केंद्र शासन, राज्य शासन, स्थनिक स्वराज्य संस्था यांची प्रचलित धोरणे व कामकाज
यावर नकारात्मक टिकाटिप्पणी, ताशेरे ओढणारा मजकूर. (अकरा) कोणत्याही प्रचलित कायदा, नियम, मा. न्यायालयीन आदेश यांनी प्रदर्शित
करण्यास प्रतिबंध घातलेला मजकूर व चित्र.
१२ जाहिरातीच्या जागेच्या बदल्यात पुरस्कृत कामे - योग्य अशा ठिकाणी पुरस्कर्त्यांना
जाहिरातीकरिता जागा देऊन त्या बदल्यात त्यांच्याकडून कामे करून घेण्यास आयुक्तास परवानगी देता येईल.
१३ जाहिरात शुल्कात सुट - सौरऊर्जा, पवनऊर्जा इत्यादी पुनःवापरायोग्य पर्यावरणपुरक
नैसर्गिक ऊर्जा साधनांचा वापर करून वीज बचत व प्रदुषण रोखणाऱ्या जाहिरातीस आकारणी योग्य शुल्काच्या २५ % इतकी सुट देण्यात येईल..
१४. जाहिरात प्रदर्शनाचे कंत्राट-
(एक) कंत्राटाचा कालावधी सर्वसाधारणपणे तीन वर्षे किंवा पुढील वित्तीय वर्षाचा ३१ मार्च
हा दिनांक यांपैकी जे अगोदर येईल तो असेल. (दोन) महानगरपालिकेच्या जागेच्या बाबतीत विनिर्दिष्ट स्थळी जाहिरात लावण्याकरिता
आयुक्तांकडून लेखी परवानगी मिळाल्यानंतर अभिकरण आयुक्तांबरोबर एक करार
करील. (तीन) जाहिरातीसाठीचे भाडे आणि फी महानगरपालिकेने वेळोवेळी मान्य केलेल्या
दरांनुसार अभिकरणाकडुन वसुल करण्यात येईल. (चार) अभिकरण महानगरपालिकेला अग्रीम म्हणन सहामाही भाडे आणि / किंवा फी देईल. (पाच) जाहिरात प्रदर्शनास परवानगी देण्यात आलेल्या फलकांपैकी १० % फलक किंवा
___ जाहिरात प्रदर्शनासाठी परवानगी मिळालेल्या दिवसांपैकी १०% दिवस अभिकरण
महानगरपालिकेला महानगरपालिकेच्या अथवा शासनाच्या विविध विभागांच्या
माहिती प्रदर्शनासाठी राखीव ठेवेल. (सहा) कंत्राटदाराने प्रदर्शित करावयाच्या जाहिरात फलकांचा आकार संपूर्ण महानगरपालिका
क्षेत्रात समान राहील. (सात) कंत्राटदाराने जाहिरात फलकांवर उजव्या बाजूच्या खालील कोपऱ्यात कंत्राटदाराचे
नाव, जाहिरात प्रदर्शनासाठी परवानगी दिलेला कालावधी व परवानगी क्रमांक
याबाबत माहिती लिहिलेली असावी. (आठ) कोणत्याही जाहिरात फलकावरील मजकूर बदलण्यापुर्वी अभिकरण सक्षम
अखत्यारीकडून मजकुराची तपासणी करून घेईल.. (नऊ) या नियमावलीतील सर्व मार्गदर्शक तत्वे व नियम, विविध प्रचलित नियम व
अधिनियम, वेळोवेळी होणारे विविध मा. न्यायालयांचे आदेश यांचे पालन करणे कंत्राटदारावर बंधनकारक असेल
१५ जाहिरात संस्था व व्यावसायिकांची नोंदणी- महानगरपालिका क्षेत्रात जाहिरात प्रदर्शित
करणाऱ्या संस्थांनी व जाहिरात छपाई करणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी महानगरपालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज व महानगरपालिकेने निर्धारित केलेले शुल्क महानगरपालिकेकडे जमा करणे आवश्यक राहील.
1.
महानगरपालिकेची जाहिरात प्रदर्शनाबाबतची परवानगी न तपासता जाहिरातीची छपाई केल्यास संबंधित व्यावसायिक महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध
करण्याकरिता अधिनियम, १९९५ अन्वये कारवाईस पात्र राहतील.
१६ व्यवसाय, उद्योग, दुकाने इत्यादींच्या नावाचे फलक - महानगरपालिका क्षेत्रातील
व्यवसाय, उद्योग, दुकाने इत्यादींवरील नावाचे फलक यांची लांबी इमारतीच्या लांबीच्या प्रमाणात तर रुंदी १ मीटर इतकी असावी. कोणत्याही परिस्थितीत या फलकांची लांबी इमारतीच्या लांबीपेक्षा अधिक असू नये व रूंदी १ मीटर पेक्षा कमी / १ मीटर पेक्षा अधिक
व्यक्साय, उद्योग, दुकाने यांच्यावर एकापेक्षा अधिक नामफलक लावल्यास अशा फलकांना जाहिरात फलक समजून विहित शुल्क आकारले जाईल. असू नये.
१७ निर्वाचनाच्या शक्ती - या नियमावलीच्या कोणत्याही तरतुदींचा अर्थ लावण्यासंबधी वा
अन्य बाबतीत विवाद उत्पन्न झाल्यास महानगरपालिका आयुक्त यांचा निर्णय अंतिम राहील.